क्राईममराठवाडालातूर जिल्हा

आरीमोड येथे ४ लाख ६८ हजारांची दारु जप्त

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये  तयार करण्यात आलेल्या आरी मोड येथील निगराणी पथकाने जवळपास ४ लाख ६८ हजार ३५५ रुपयांची वेगवेगळ्या ब्रँड च्या ‘  कंपनीची  विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे .या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन माल जप्त करण्यात आला आहे.
शिरूर अनंतपाळ पोलीसांना खब-या मार्फत विदेशी दारू घेऊन जात असलेला  एम एच २४ ए . बी ५४ ७० नंबरचा छोटा हत्ती शिरूर अनंतपाळकडे येत असल्याचे माहिती शिरुर अनंतपाळ पाेिलसांना खब-यामार्फत मिळली होती.  त्यानुसार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी सापळा रचून आरी मोड येथे असलेल्या निगरानी पथकाला तशी कल्पना दिली  व आपले दोन पोलीस कर्मचारी आरी मोड येथे दि २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान पाठवून दक्ष राहून  विदेशी दारु घेऊन येणारा छोटा हत्ती टेम्पोची झाडा झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या ब्रँड च्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.
यात रॉयल स्टॉग, प्राईड व्हीस्की, ब्लेंडर स्प्राईड व्हीस्की, मॅजिक मोमेंट, गोवा जिन, रॉयल स्टॉक बॅरल सलेस्ट अशा विविध नावाच्या ९० एम एल, व १८० एम एलच्या बॉटल या छोटा हत्तीमध्ये वाहतूक करताना आढळून आल्या. ज्याचीकिंमत २ लाख १८ हजार ३५५ व टेम्पोची किमंत २ लाख ५०००० हजार असा जवळ पास ४ लाख ६८ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल शिरूर अनंतपाळच्या पोलिसांच्या सहकार्याने व आरी मोड येथील निगराणी पथकाच्या सतर्कतेने जप्त करण्यात आला.
निवडणुकीच्या काळात  खेड्यापाड्या वाटण्यासाठी घेऊन जात असलेल्या विदेशी दारूच्या बॉटल नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात पोलीस कर्मचारी विलास अर्जूने यांच्या फिर्यादी वरून आरोपी गुलाब अमीर कादरी रा.मळवटी रोड लातूर यांच्या विरुद प्रो. गु र न ९४ / २४ कलम ६५ (अ ) ( इ ) मुंबई दारू बंदी कायदयान्वये शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास  पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे हे करीत आहेत . या निगरानी पथकाच्या माध्यमातून २४ तास आरी मोड  येथे येणा-या सर्व गाड्यांची तपासणी या पथकाच्या माध्यमातून केली जात आहे. या ठिकाणी अवैध पैसा, अवैध दारू , शस्त्र वाहतूक, भेटवस्तू वाटप यावर आळा घालण्यासाठी चेक पोस्टच्या माध्यमातून या पथकाचे कटाकक्षाने नियंत्रण आहे. त्यामुळेच मोठी कार्यवाही झाल्याचे दिसुन येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button