महाराष्ट्रराजकीयलातूर जिल्हा

मावळत्या खासदाराला या निवडणुकीत धडा शिकवा – आमदार अमित देशमुख

साकोळ दि. २८ : सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत विकासावर बोलत नाही आपल्या मतदार संघातील काय काम केलं ? यावर बोलत नाही पाच वर्षात एकदाही मतदार संघातील विकासाचे काम तर सोडा साधं गावात सुधा फिरकले नाहीत असा लोकांना या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवला पाहिजे व सुसंस्कृत प्रामाणिक माणूस डॉ शिवाजी काळगे यांना मोठया मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करत मागच्या १० वर्षात निलंगा विधानसभा मतदार संघात विकासाचे काय काम केले ते स्थानीक लोकप्रतिनिधीनी सांगावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री कोंग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

ते शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ संतोष कवठाळे हे होते. तर व्यासपिठावर कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंके, राष्ट्रवादीचे डॉ बापूसाहेब पाटील, शिवसेनेच्या नेत्या डॉ शोभा बेंजर्गे, लोकसभा आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे, बंडाप्पा काळगे, डॉ अरविंद भातंब्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

निर्दयी सरकार केंद्रातील सरकार भाजपचे १० वर्षापासून सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य माणूस महागाईच्या वणव्यात होरपळत आहे महागाई वाढवली पेट्रोल डिझेल दरवाढ केली व्यापार थंडावला जी एस टी सुरू केली छोटे व्यवसायिक यांची पिळवणूक सुरू आहे. दंड व्याज वसूल करत आहेत हे थांबावन्यासाठी राहुल गांधी गॅरंटी इंडिया आघाडी कडे सत्ता द्या निश्चित पने आपले बुरे दीन जायेंगे इंडिया आघाडी आयेगी आच्छे दीन लायेंगे हा आमचा विश्वास आहे नुकत्याच झालेल्या कर्नाटक तेलंगणा राज्यात जी गॅरंटी कार्ड दिले होते त्या योजना काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळें लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण डॉ शिवाजी काळगे यांना त्यांच्या होम तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

* तालुक्यात गावागावात जाऊन काळगे यांच्यासाठी एकत्र या

यावेळी आमदार अमित देशमुख यांनी डॉ शिवाजीराव काळगे यांचा शिरूर अनंतपाळ तालुका असल्यांने लोकांनी आपला माणूस लोकसभेत पोहोचणार आहे त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ठराव घेवून मतदान करावे यासाठी सर्व गावांनी प्रयत्न करावा असे झाले तर अधिक मताधिक्य या तालुक्यातून मिळेल
तसेच देवणी निलंगा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा क्षेत्रात अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तयारीला लागावे

निलंगा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यरत आहेत डॉ शिवाजी काळगे यांना मोठा पाठिंबा मिळत असून मताधिक्य मिळेल पण अधिक मताधिक्य मिळेल यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उस उत्पादक शेतकऱ्यांचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले कौतुक यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी धावत्या दौऱ्यात या परिसरातील साकोळ जवळगा, सांगवी, घुगीं परिसरात जी उसाची लागवड होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे कौतुक करून याचे जनक लोकनेते विलासराव देशमुख सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या मांजरा साखर परिवाराकडून यांना योग्य भाव देवुन उस उत्पादक शेतकऱ्यांना सन्मान केला आहे भविष्यात जे जे चांगल करता येईल ते करणार आहे असे सांगून या परिसरातील जागृती शुगर ने या भागातील साकोळ गटातील ६७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून चांगला योग्य भाव दिला आहे तसेच जिल्हा बँकेने या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले त्याला परिवारातील साखर संस्थांनी सहकार्य केल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे हा खरा विकास काँग्रेस पक्षाने केलेला आहे असेही ते म्हणाले..
यावेळी निरीक्षक संतोष देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, राजकुमार पाटील, कल्याण बरगे, शिरूर अनंतपाळ काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, संजय बिराजदार, अजित माने मीनाताई बंडले, चक्रधर शेळके, लक्ष्मण बोधले , शेळके ,भिक्का , सुधीर लखन गावे, अँड सुतेज माने, अनिल पाटील यांच्यासह साकोळ, जवळगा सांगवी घुगी शेंद तीपराळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला आशिर्वाद द्या महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे मला आपण
साथ द्यावी येणाऱ्या ७ मे रोजी हात या चिन्हावर बटण दाबून विजयी करा आशिर्वाद द्यावा मी निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास यावेळी लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांनी बोलताना सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button