Online News Portal https://netizensmedia.net News Service Provider from Latur. Mon, 13 May 2024 06:30:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 निवडणूक वार्तांकनावेळी आज तकच्या पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यू https://netizensmedia.net/journalist-of-aaj-tak-dies-in-beed-during-election-coverage/ https://netizensmedia.net/journalist-of-aaj-tak-dies-in-beed-during-election-coverage/#respond Mon, 13 May 2024 06:30:00 +0000 https://netizensmedia.net/?p=1245 बीड : बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते. अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते. सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.

अत्यंत शांत, संयमी आणि मृदूभाषी स्वभावाचे म्हणून वैभव कनगुटकर कुटुंब, सहकारी आणि मित्र परिवारामध्ये परिचित होते. ते ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंब, सहकारी शोकसागरात बुडाले आहेत.

]]>
https://netizensmedia.net/journalist-of-aaj-tak-dies-in-beed-during-election-coverage/feed/ 0
अजित पवार यांच्याकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकीची भाषा https://netizensmedia.net/threatening-language-from-ajit-pawar-to-rival-candidate/ https://netizensmedia.net/threatening-language-from-ajit-pawar-to-rival-candidate/#respond Mon, 13 May 2024 05:51:28 +0000 https://netizensmedia.net/?p=1242 पुणे :  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election)  महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या भाषेची पातळीसुद्धा कधीकधी खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पण यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषा मात्र अधिक खटकणारी होती.  जमेल तेव्हा आणि जमेल तिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकी देण्याचा सपाटाच त्यांनी  लावला अजित पवार यांचा (Ajit Pawar)  संताप का झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

अजितदादा म्हणजे एक घाव दोन तुकडे…अजित पवार कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवारांचा वेगळा रागरंग दिसून आला. आपल्या उमेदवारांसाठी घेत असलेल्या प्रचारासभेत दादांच्या तोंडी प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल चक्क धमकीची भाषा दिसायला लागलीय.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि  बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. अमोल कोल्हेंवर टीका केली.  काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शिरुरचे शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांना उघड-उघड धमकी दिली होती.

अमोल कोल्हेंवर काय टीका केली?

बिबट्यामुळे कुत्रा राहिला नाही म्हणून बिबट्या माणसांवर हल्ला करु लागला. बिबट्यासमोर कोल्हेला सोडा.’, असा टोला त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.

बजरंग सोनावणेंवर काय टीका केली?

पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या,  बजरंगा तू सांगायाचा छाती पडला की हे दिसतो तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती पडली की मरून जातो… तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनावणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बर चालले होते, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे मस्ती त्याला आली.

2019 मध्ये अजित पवारांची विजय शिवतारेंना धमकी?

पारनेरमध्ये अजित पवारांनी निलेश लंके यांच्याबाबतीत जिरवण्याची भाषा केली.निवडणुकीच्या आधीही अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता.2019 मध्ये अजित पवारांनी विजय शिवतारेंना आमदार कसे होता ते बघतोच अशी धमकी दिली होती. अजित पवारांचा हा तापट स्वभाव यंदाच्या निवडणुकीत वारंवार दिसून येतोय..

अजित पवारांचा संयम संपत चाललाय?

धरणाचं वक्तव्य भोवल्यानंतर अजित पवार बोलताना काळजी घ्यायला लागले होते. पण या निवडणुकीत त्यांचा संयम संपत चालल्याचं त्यांच्या भाषेवरून दिसून येतंय. महायुतीत अजित पवारांच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी बारामतीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचं दडपण त्यांच्यावर असलं तरी त्यांची बघून घेण्याची भाषा मात्र लोकांच्या पचनी पडणारी नाही.

]]>
https://netizensmedia.net/threatening-language-from-ajit-pawar-to-rival-candidate/feed/ 0
एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप https://netizensmedia.net/bags-full-of-money-in-the-hands-of-eknath-shindes-bodyguards-sanjay-rauts-allegation/ https://netizensmedia.net/bags-full-of-money-in-the-hands-of-eknath-shindes-bodyguards-sanjay-rauts-allegation/#respond Mon, 13 May 2024 05:39:47 +0000 https://netizensmedia.net/?p=1239 नाशिक: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची धावपळ सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे त्यांनी म्हटले. राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. मात्र, आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

या व्हिडिओत  एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेले दिसत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकांचा ताफा आहे. या ताफ्यातील दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस आणि बॅग दिसत आहे. या बॅगांमध्ये नेमके काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्री दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी इतक्या बॅगा का घेऊन आले?, असा सवाल करुन संजय राऊत यांनी पैसेवाटपाची शंका उपस्थित केली आहे.

पुण्यात भाजपकडून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यासाठी धंगेकर यांनी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यासाबेर ठिय्या आंदोलन केले होते. तर नगरमध्येही पैसेवाटप झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे, अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिली.

]]>
https://netizensmedia.net/bags-full-of-money-in-the-hands-of-eknath-shindes-bodyguards-sanjay-rauts-allegation/feed/ 0
छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना https://netizensmedia.net/in-chhatrapati-sambhajinagar-evm-machines-broke-down-in-25-places-evms-will-not-start-even-in-parli/ https://netizensmedia.net/in-chhatrapati-sambhajinagar-evm-machines-broke-down-in-25-places-evms-will-not-start-even-in-parli/#respond Mon, 13 May 2024 05:16:45 +0000 https://netizensmedia.net/?p=1236 छत्रपती संभाजीनगर: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) मतदानाला सुरुवात होतानाच मोठा अडथळा उभा राहिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन (EVM) बिघडल्याचा प्रकार समोर आला.

ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अखेर या 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला.  त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या  रांगा लागल्या होत्या. राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मतदार सकाळच्या वेळेत मतदान आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने सकाळच्याच वेळेत मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ होताना दिसली.

बीड लोकसभेच्या मतदानापूर्वी आदल्या रात्री भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळीतील काळरात्री मंदिराला भेट दिली. त्यांनी रात्री उशीरा काळरात्री मंदिरात पूजाअर्चा केली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यामुळे बीडमध्ये यंदा पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान असल्याचे चित्र आहे. पंकजा मुंडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आणि वंचितचे अशोक हिंगे यांचे मुख्य आव्हान आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकूण 2040 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 41 उमेदवार आहेत. मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांसोबत केरळ पोलिसांच्या तुकड्याही अतिरिक्त सुरक्षेसाठी बोलवण्यात आल्या आहेत. लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी केरळ पोलीस आणि सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

]]>
https://netizensmedia.net/in-chhatrapati-sambhajinagar-evm-machines-broke-down-in-25-places-evms-will-not-start-even-in-parli/feed/ 0
लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू – फडणवीस https://netizensmedia.net/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/ https://netizensmedia.net/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/#respond Mon, 29 Apr 2024 07:21:48 +0000 https://netizensmedia.net/?p=1232 राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,’ अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली.

राज्य सहकारी बॅंकेने 430 कोटी रुपयांच्या थकीत प्रकरणात विठ्ठल सहकारी साखर काखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. तीन गोदामेही सील केली आहेत. त्यामुळे अभिजित पाटील  यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अभिजित पाटील हे माध्यमांशी बोलत होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर  झालेल्या जप्तीच्या कारवाईबाबतचा विषय आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला आहे. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे. शेतकऱ्यांची संस्था वाचविण्याची विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारखान्याच्या मदतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे आणि ते आम्हाला मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत आजच्या भेटीत कोणतीही चर्चा झालेली नाही. या भेटीत केवळ कारखान्याला मदत करण्याबाबत चर्चा झाली. भाजपमध्ये जण्याबाबत आमच्या दोघांमध्ये अजून तरी कसलीही चर्चा झाली नाही. असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्हाला (लोकसभा निवडणुकीत) मदत करा, आम्ही तुम्हाला (विठ्ठल कारखाना जप्ती प्रकरण) मदत करू, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. ते (देवेंद्र फडणवीस) आम्हाला मदत करत असतील, तर लोकसभा निवडणुकीत आम्ही देखील त्यांना (भाजपला) मदत करू, असे सांगून अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

]]>
https://netizensmedia.net/help-bjp-in-lok-sabha-we-will-help-vitthal-factory/feed/ 0
मावळत्या खासदाराला या निवडणुकीत धडा शिकवा – आमदार अमित देशमुख https://netizensmedia.net/teach-former-mp-a-lesson-in-this-election-mla-amit-deshmukh/ https://netizensmedia.net/teach-former-mp-a-lesson-in-this-election-mla-amit-deshmukh/#respond Mon, 29 Apr 2024 06:50:40 +0000 https://netizensmedia.net/?p=1229 साकोळ दि. २८ : सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत विकासावर बोलत नाही आपल्या मतदार संघातील काय काम केलं ? यावर बोलत नाही पाच वर्षात एकदाही मतदार संघातील विकासाचे काम तर सोडा साधं गावात सुधा फिरकले नाहीत असा लोकांना या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवला पाहिजे व सुसंस्कृत प्रामाणिक माणूस डॉ शिवाजी काळगे यांना मोठया मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करत मागच्या १० वर्षात निलंगा विधानसभा मतदार संघात विकासाचे काय काम केले ते स्थानीक लोकप्रतिनिधीनी सांगावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री कोंग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

ते शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ संतोष कवठाळे हे होते. तर व्यासपिठावर कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंके, राष्ट्रवादीचे डॉ बापूसाहेब पाटील, शिवसेनेच्या नेत्या डॉ शोभा बेंजर्गे, लोकसभा आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे, बंडाप्पा काळगे, डॉ अरविंद भातंब्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

निर्दयी सरकार केंद्रातील सरकार भाजपचे १० वर्षापासून सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य माणूस महागाईच्या वणव्यात होरपळत आहे महागाई वाढवली पेट्रोल डिझेल दरवाढ केली व्यापार थंडावला जी एस टी सुरू केली छोटे व्यवसायिक यांची पिळवणूक सुरू आहे. दंड व्याज वसूल करत आहेत हे थांबावन्यासाठी राहुल गांधी गॅरंटी इंडिया आघाडी कडे सत्ता द्या निश्चित पने आपले बुरे दीन जायेंगे इंडिया आघाडी आयेगी आच्छे दीन लायेंगे हा आमचा विश्वास आहे नुकत्याच झालेल्या कर्नाटक तेलंगणा राज्यात जी गॅरंटी कार्ड दिले होते त्या योजना काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळें लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण डॉ शिवाजी काळगे यांना त्यांच्या होम तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

* तालुक्यात गावागावात जाऊन काळगे यांच्यासाठी एकत्र या

यावेळी आमदार अमित देशमुख यांनी डॉ शिवाजीराव काळगे यांचा शिरूर अनंतपाळ तालुका असल्यांने लोकांनी आपला माणूस लोकसभेत पोहोचणार आहे त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ठराव घेवून मतदान करावे यासाठी सर्व गावांनी प्रयत्न करावा असे झाले तर अधिक मताधिक्य या तालुक्यातून मिळेल
तसेच देवणी निलंगा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा क्षेत्रात अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तयारीला लागावे

निलंगा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यरत आहेत डॉ शिवाजी काळगे यांना मोठा पाठिंबा मिळत असून मताधिक्य मिळेल पण अधिक मताधिक्य मिळेल यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उस उत्पादक शेतकऱ्यांचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले कौतुक यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी धावत्या दौऱ्यात या परिसरातील साकोळ जवळगा, सांगवी, घुगीं परिसरात जी उसाची लागवड होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे कौतुक करून याचे जनक लोकनेते विलासराव देशमुख सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या मांजरा साखर परिवाराकडून यांना योग्य भाव देवुन उस उत्पादक शेतकऱ्यांना सन्मान केला आहे भविष्यात जे जे चांगल करता येईल ते करणार आहे असे सांगून या परिसरातील जागृती शुगर ने या भागातील साकोळ गटातील ६७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून चांगला योग्य भाव दिला आहे तसेच जिल्हा बँकेने या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले त्याला परिवारातील साखर संस्थांनी सहकार्य केल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे हा खरा विकास काँग्रेस पक्षाने केलेला आहे असेही ते म्हणाले..
यावेळी निरीक्षक संतोष देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, राजकुमार पाटील, कल्याण बरगे, शिरूर अनंतपाळ काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, संजय बिराजदार, अजित माने मीनाताई बंडले, चक्रधर शेळके, लक्ष्मण बोधले , शेळके ,भिक्का , सुधीर लखन गावे, अँड सुतेज माने, अनिल पाटील यांच्यासह साकोळ, जवळगा सांगवी घुगी शेंद तीपराळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला आशिर्वाद द्या महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे मला आपण
साथ द्यावी येणाऱ्या ७ मे रोजी हात या चिन्हावर बटण दाबून विजयी करा आशिर्वाद द्यावा मी निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास यावेळी लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांनी बोलताना सांगितले

]]>
https://netizensmedia.net/teach-former-mp-a-lesson-in-this-election-mla-amit-deshmukh/feed/ 0
भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर https://netizensmedia.net/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/ https://netizensmedia.net/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/#respond Mon, 29 Apr 2024 06:45:38 +0000 https://netizensmedia.net/?p=1226 पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून त्यानं रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार समजताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या तरुणानं बॅनरवर त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही छापला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात घेऊन गेले. इथल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराचा आक्रोश येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा बॅनरवरुन देण्यात आला होता. भाजपनं मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर बरोजगारीचा प्रश्न विचारणारे बॅनर लावल्याचा प्रकार समोर येताच पोलिसांची धावपळ झाली. आयुष कांबळे नावाच्या तरुणानं हे बॅनर लावले होते. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते. पोलिसांनी हे बॅनर खाली उतरवले.

आयुष कांबळे टेम्पो चालवून गुजरात करतो. तो सध्या पदवीचं शिक्षण घेत आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. सुशिक्षित तरुणांचा नोकऱ्या नाहीत. त्यामुळे कोणी तरी या प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज होती. विरोधात बोलल्यावर कारवाई होणार याची कल्पना होती. आपणच का बोलू नये असा प्रश्न पडला. त्यामुळे तरुणांचा प्रश्न उपस्थित केला, असं आयुषनं सांगितलं.

आमच्या हक्काचे रोजगार राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मनात असलेले विचार मी बॅनरच्या माध्यमातून मांडले. मी हे कोणाच्याही सांगण्यावरुन केलेलं नाही. मी स्वत: ते फ्लेक्स बांधले आहेत. फ्लेक्स लावल्यावर दडपशाही होणार याची कल्पना होती. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्या फ्लेक्सवर शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो आहेत. ही माझी दैवतं आहेत. ती माझ्याशी पाठिशी आहेत. मी कोणताही गु्न्हा केलेला नाही. पोलिसांकडून अद्याप तरी फोन आलेला नाही. काही कारवाई केल्यास कायदेशीर उत्तर देऊ, अशा शब्दांत आयुषनं बॅनर लावण्यामागील त्याचा हेतू सांगितला.

]]>
https://netizensmedia.net/banner-of-unemployed-youth-on-bjp-banner/feed/ 0
उदगीर-जळकोट मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण https://netizensmedia.net/congress-atmosphere-in-udgir-jalkot-constituency/ https://netizensmedia.net/congress-atmosphere-in-udgir-jalkot-constituency/#respond Mon, 29 Apr 2024 06:34:16 +0000 https://netizensmedia.net/?p=1223 जळकोट : प्रतिनिधी
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे दि. २७ एप्रिल रोजी सभा पार पडली. प्रचंड ऊन असतानाही ४१ अंश सेल्सिअस तापमान असतानाही या सभेला नागरिकांची गर्दी झाली होती. प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे उदगीर जळकोट मतदारसंघामध्ये काँग्रेसमय वातावरण झालेले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी सभेसाठी स्वयंस्फूर्तपणे नागरिकांची उपस्थिती होती. दुपारी तीन ला आयोजित असलेली सभा साडेचार वाजता सुरू झाली, प्रियंका गांधी यांचे भाषण साडेचार वाजता सुरू झाले तोपर्यंत सभामंडपामधील एकही व्यक्ती जागेवरून हलला नाही हे या सभेचे वैशिष्ट्य होते . सभा संपल्यानंतर नागरिक हे एकमेकाशी हितगुज करताना प्रियंका गांधी यांच्या भाषणाचीच चर्चा करत होती .प्रियंका गांधी यांनी त्यांचे भाषण हे अतिशय मुद्देसूद पणे मांडले , सध्या सुरू असलेली महागाई, नोकरीसाठी भटकंती करणारा युवक, शेतक-यांच्या शेतीमालाला नसलेला भाव, जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेले लूट, वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव , वाढलेले गॅसचे भाव, याविषयी मार्गदर्शन केले .

यासोबत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये देणार, शेतक-याांना आवश्यक असलेल्या वस्तूवर लावण्यात आलेला जीएसटी कर रद्द करणार , डीग्री घेतलेल्या प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी देणार, शेतक-यांना कर्जमाफी देणार , जेव्हा शेतक-यांंना कर्जमाफीची गरज असेल तेव्हा त्यांना देण्यासाठी आयोगाची स्थापना करणार , शेतक-यांना एम एस सी प्रमाणे शेतीमालाला भाव देणार असे अनेक आश्वासन त्यांनी यावेळी दिले
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात राष्ट्रसंत शिवंिलग शिवाचार्य महाराज यांच्या नामस्मरणाने केली. या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची देखील आठवण काढली. भाषण झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी सुरक्षा कवच तोडून सभा मंडपामध्ये उपस्थित महिलांना भेटल्या, त्यांच्यासोबत सेल्फी काढली.

]]>
https://netizensmedia.net/congress-atmosphere-in-udgir-jalkot-constituency/feed/ 0
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वृक्षांची कत्तल https://netizensmedia.net/slaughter-of-trees-for-pm-modis-meeting/ https://netizensmedia.net/slaughter-of-trees-for-pm-modis-meeting/#respond Mon, 29 Apr 2024 06:31:03 +0000 https://netizensmedia.net/?p=1220 लातूर :  सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. दिल्लीतील नेते मंडळी गल्लीत पोहचले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचारसभा घेत आहे. ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लातूर येथे भाजपची प्रचार सभा घेत आहेत. लातूर येथील रिंगरोड परिसरातील सारोळा रोड येथे मोदींची सभा होणार आहे. परंतु सभेसाठी जाणारा मार्ग व त्या मैदानवरील वृक्षतोड सर्रासपणे होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सारोळा रोड परिसरात मोठी जय्यत तयारी आठ दिवसापासून सुरू आहे. पंतप्रधान ज्या मार्गावरून येणार त्या मार्गाचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. परिसरातला कचरा व घाण साफ करण्यात येत आहे. परंतु सर्वात मोठी बाब म्हणजे सभेसाठी जाणारा मार्ग व त्या मैदानवरील वृक्षतोड सर्रासपणे होत आहे.
एका बाजूने लातूर वृक्ष, ग्रीन लातूरच्या माध्यमातून सुपर्ण जगताप, डॉ.पवन लड्डा यां सारखी मंडळी आपल्या टीम सोबत कष्टाने एक एक थेंब पाणी टाकून वृक्ष वाढवून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुस-या बाजूला एका तासाच्या सभेसाठी शेकडो वृक्षांचा बळी घेऊन लातूरच्या पर्यावरणाचा -हास केला जात आहे अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
]]>
https://netizensmedia.net/slaughter-of-trees-for-pm-modis-meeting/feed/ 0
विकासाबद्दल न बोलणा-यांना धडा शिकवा https://netizensmedia.net/teach-those-who-dont-talk-about-development-a-lesson/ https://netizensmedia.net/teach-those-who-dont-talk-about-development-a-lesson/#respond Mon, 29 Apr 2024 06:28:10 +0000 https://netizensmedia.net/?p=1217 लातूर :  सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. विकासावर बोलत नाहीत आपल्या मतदार संघातील काय काम केलं? यावर बोलत नाहीत पाच वर्षात एकदाही मतदारसंघातील विकासाचे काम तर सोडा साधे गावात सुधा फिरकले नाहीत, असा लोकांना या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. मागच्या १० वर्षात निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाचे काय काम केले ते स्थानीक लोकप्रतिनिधीनीही सांगावे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री कोंग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ संतोष कवठाळे हे होते. मंचावर कोंग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंके, राष्ट्रवादीचे डॉ बापूसाहेब पाटील, शिवसेनेच्या नेत्या डॉ शोभा बेंजर्गे, लोकसभा आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे, बंडाप्पा काळगे, डॉ अरंिवंद भातंब्रे आदि मान्यवर उपस्थित होते. निर्दयी सरकार केंद्रातील सरकार भाजपचे १० वर्षांपासून सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य माणूस महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. महागाई वाढवली, पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली. व्यापार थंडावला जीएसटी सुरू केली.

छोट्या व्यवसायिकांची पिळवणूक सुरू आहे. दंड व्याज वसूल करीत आहेत हे थांबाविण्यासाठी राहूल गांधी गॅरंटी इंडिया आघाडीकडे सत्ता द्या निश्चीतपणे आपले बुरे दीन जायेंगे इंडिया, आघाडी आयेगी आच्छे दीन लायेंगे हा आमचा विश्वास आहे नुकत्याच झालेल्या कर्नाटक, तेलंगणा राज्यात जी गॅरंटी कार्ड दिले होते त्या योजना काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळें लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण डॉ शिवाजी काळगे यांना त्यांच्या तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी निरीक्षक संतोष देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, राजकुमार पाटील, कल्याण बरगे, शिरूर अनंतपाळ काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस मीडिया सेलचे जल्हिाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, संजय बिराजदार, अजित माने मीनाताई बंडले, चक्रधर शेळके लक्ष्मण बोधले , शेळके, भिक्का ,सुधीर लखन गावे, अँड सुतेज माने,अनिल पाटील यांच्यासह साकोळ, जवळगा, सांगवी, घुगी, शेंद तीपराळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

]]>
https://netizensmedia.net/teach-those-who-dont-talk-about-development-a-lesson/feed/ 0